एचआयव्ही बाधीत रक्तपुरवठा झाल्यामुळे आठ महिन्यांच्या एका चिमुकलीला एचआयव्ही झाल्याची धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आलीय. अकोल्यातील मूर्तीजापुरात हा प्रकार घडलाय. महिनाभरापूर्वीच्या या प्रकाराची तक्रार या चिमुकलीच्या पालकांनी जिल्हाधिकाऱ्यांमार्फत आरोग्यमंत्र्यांकडे दिल्याची माहिती आहे. <br />मूर्तिजापूर इथल्या अवघाते हॉस्पीटलमध्ये तालुक्यातील हिरपूरमधील या मुलीवर उपचार सुरू होते. तिच्या शरीरातील पांढऱ्या पेशी कमी झाल्यामुळे अकोल्याच्या बी. पी. ठाकरे रक्तपेढीतून मागविण्यात आलेले रक्त तिला देण्यात आले होते. त्यानंतरही तिच्या शरीरातील पांढऱ्या पेशींमध्ये वाढ होत नसल्याचं निदर्शनास आल्यामुळे तिला अमरावतीच्या रुग्णालयात हलविण्यात आलं होतं. इथल्या तपासणीत तिचा एचआयव्ही अहवाल पॉझिटिव्ह आला. तिच्या आई-वडीलांचा अहवाल मात्र निगेटीव्ह आला. त्यामुळे एच आय व्ही बाधीताचे रक्त देण्यात आल्यामुळे ही चिमुकली एचआयव्ही बाधीत झाल्याची माहिती आहे. कुणाचंही रक्त देताना एचआयव्ही चाचणी करण बंधनकारक आहे. असं असताना एका चिमुकलीचं आयुष्य उद्ध्वस्त करणारी ही अक्षम्य चूक कुणाकडून झाली आणि या पुढे असं होऊ नये यासाठी खबरदारी घेणं गरजेचं आहे. <br />#hiv #hospital #bloodbank #akola #amravati #maharshtra #marathinews #marathi #sakal #sakalmedia #sakalmarathinews #sakalmarathi<br />